कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंटतर्फे डीआरएचपी   

भारतातील दुसरी सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी डीआरएचपी सादर केला. कॅनरा बँक आणि ओआरआयएक्स कॉर्पोरेशन युरोप एन.व्ही हे कंपनीचे प्रवर्त क आहेत. या ऑफरमध्ये प्रत्येकी <१० दर्शनी मूल्याच्या ४९,८५४,३५७ इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. कॅनरा रोबेको अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या मूलभूत कार्यक्षेत्रात म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन आणि भारतीय इक्विटीजवर गुंतवणूक सल्ला देणे याचा समावेश होतो. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत, १२ इक्विटी योजनांसह २५ योजनांचे व्यवस्थापन करते, यात १० कर्ज योजना आणि तीन हायब्रिड योजनांचा समावेश आहे. यांची तिमाहीतील सरासरी ॒णच् ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत <१,०८३.६६ अब्ज आहे. कंपनीकडे एक मल्टी-चॅनेल विक्री आणि वितरण नेटवर्क आहे जे ग्राहकांना उत्पादने आणि सेवा देते. यात थर्ड पार्टी वितरक, तसेच नेटवर्कच्या शाखा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या विक्रीचा समावेश होतो.  बीएसई आणि एनएसइवर  इक्विटी शेअर्स सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. एसबीआय कॅपिटल मार्केट्स , अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल  हे  इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Related Articles